Ad will apear here
Next
खासदार गिरीश बापट यांचा रिपब्लिकन पक्षातर्फे सत्कार
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पुणे शाखेतर्फे महायुतीचे पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांचा सत्कार करण्यात आला.

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पुणे शाखेतर्फे महायुतीचे पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून गिरीश बापट यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत, फटाके फोडून विजयोत्सव साजरा केला. प्रचारातील सक्रिय सहभागाबद्दल गिरीश बापट यांनी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.

या वेळी महापौर मुक्ता टिळक, ‘आरपीआय’चे पुणे शहर अध्यक्ष अशोक कांबळे, ‘आरपीआय’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर, राष्ट्रीय निमंत्रक अॅड. मंदार जोशी, नगरसेविका हिमाली कांबळे, सुनीता वाडेकर, सोनाली लांडगे, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, युवक आघाडीचे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, सचिव महिपाल वाघमारे, आदी उपस्थित होते.

गिरीश बापट म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांसारख्या थोर समाजसुधारकांना अभिवादन करून खासदार म्हणून काम करण्यास सुरुवात करीत आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेनेसह रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गेली तीन महिने अहोरात्र मेहनत घेतली. कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे हे फळ आहे. माझ्या विजयात ‘आरपीआय'च्या कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे. झोपडपट्टीधारकांना स्वत:चे घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’


या वेळी संजय सोनावणे, निलेश आल्हाट, जयदेव रंधवे, किरण भालेराव, संतोष खरात, चंद्रकांता सोनकांबळे, संघमित्रा गायकवाड, शशिकला वाघमारे, आशिष भोसले, बाबुराव घाडगे,सुन्नबी शेख, रमेश तेलवडे, के. जी पवळे, नंदा निकाळजे, मंगल राजगे, भगवान गायकवाड आदी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZOUCA
Similar Posts
महाजनादेश यात्रेच्या प्रचारार्थ डिजिटल चित्ररथ सज्ज पुणे : महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे सदस्य, ज्येष्ठ पत्रकार व कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या चित्ररथाचे उद्घाटन नुकतेच पुण्यात खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते झाले.
रिपब्लिकन पक्षाच्या महापालिकेतील कार्यालयाचे उद्घाटन पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) पुणे महानगरपालिकेतील पक्ष कार्यालयाचे रविवारी, २३ जून रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
‘भीमा-कोरेगावला भव्य राष्ट्रीय स्मारक उभारणार’ पुणे : ‘जातीयवादातून होणारा अन्याय थांबविण्यासाठी, देशहितासाठी भीमा-कोरेगाव येथे दोनशे वर्षांपूर्वी ५०० महारांनी गाजवलेल्या शौर्याचे प्रतीक असलेल्या विजयस्तंभाला आज दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत. क्रांतिकारक विचारांची प्रेरणा देणाऱ्या या विजयस्तंभाच्या परिसरात, भीमा-कोरेगावात भव्य स्मारक उभारणार आहे. त्यासाठी
पुणे येथे ‘वाचून मोठे होऊया’ उपक्रम पुणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त ‘नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे होऊया’ हा संकल्प हाती घेण्यात आला असून, या संकल्पाअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीतर्फे १४ एप्रिलला डॉ. आंबेडकरांच्या जयंतीदिनी महापुरुषांच्या दहा हजार पुस्तकांचे मोफत वाटप

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language